सफर कोकणातील #Kokan #Day_1

कोकण


हा माझा पहिलाच ब्लॉग आहे काही चूकल तर माफी असावी.

या ब्लॉग मध्ये मी माझा कोकणातील अनुभव व्यक्त करत आहे.
कोकण म्हणजे नेमकं काय असत हे काही मला माहिती नव्हतं. लहान पनापासून कोकणात वगैरे गेलो नव्हतो. फक्त एकच कोकम मला माहित होतं ते म्हणजे सरबत. तर ते जिथं बनत तिथं आमचा जायचा प्लॅन अचानक बनला. ते म्हणतात ना अचानक भयानक. एक वीकएंड आणि एक शासकीय सुट्टी आलेली होती आणि आम्ही एक आधी घेतली.
तर सुरवात करतो ते आमच्या प्लॅनिंग पासून च आम्ही चार मित्र मी निशांत , वेदांत , संकेत आणि स्वप्नील सुरवात झाली ती वेदांत च्या फोन वरून कट्टयावर भेटायला बोलवलं होत सगळ्यांना. त्या प्रमाणे त्या संध्याकाळी आम्ही आमच्या नेहमीच्या कट्ट्यावर भेटलो. वेदांत च्या डोक्यात Weekend + सुट्टी = Trip ही कल्पना आलती . कुठं जायचं तर जवळ्यात जवळ म्हणून आणि First Time Experiance म्हणून आम्ही कोकणातील भाग निवडला. असा पण उन्हाळ्याचे शेवटचे दिवस होते त्यामुळे समुद्रकिनारी जायचा प्लॅन तर भन्नाट होता. तो दिवस मंगळवार होता म्हणजे आमचा WeekEnd तर मार्गी लागणार होता. प्लॅनिंग केली , गाडी ड्राइवर सहित , कुणी काय खायला घायच वैगेरे वगैरे.
आणि मग तो दिवस उगवला सरता करता 9 च्या दरम्यान आम्ही नगर सोडलं आणि रोड ला लागलो 9 वाजले असल्या कारणाने नाश्ता वैगेरे झाला होता त्यामुळे पेट पूजा च थोडा काळ टेन्शन नव्हतं. आमचा पहिला थांबा झाला तो रांजणगाव लाच महागणपती ला गणपती बाप्पा चे दर्शन घेऊन मस्त 1 / 1 कप चहा मारून परत प्रवास सुरु केला . रांजणगाव बद्दल काही वेगळी माहीती दयायला नकोच.महाराष्ट्रात असलेल्या अष्टविनायकांपैकी चौथा गणपती रांजणगावात आहे. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे.  अष्टविनायक पैकी एक गणपती ज्याची प्रचितीच वेगळी आहे. आत मध्ये गेल्यावर मंदिराचे बांधकाम दगडी आहे ते कळते , त्या काळात देखील त्या मध्ये कोरीव काम अगदी नवीन इंजिनिअर देखील लाजवून सोडेल. नन्तर मग भूक लागली होती सोबत चपात्या वगैर होत्याच मग एका धाब्यावर गाडी थांबवून आम्ही जेवन केलं . पोट भरल्यावर थोडी Energy आली प्रवासाला Enjoy करायची आणि ओढ लागली माझ्या तरी आयुष्यातल्या पहिला समुद्रकिनारा बघण्याची.
त्यांनंतरचा स्टॉप म्हणजे मोरगाव चा गणपती मोरेश्वर. तिथे तुरळक गर्दी पाहायला मिळाली. अष्टविनायकातील सर्वांत पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयूरेश्वर ओळखला जातो. मोरेश्वराचे मंदिर म्हणजे एक प्रशस्त गढीच आहे. मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असन ते जुन्या काळात बांधले गेले. गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूंनी मनोरे आहेत. मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे. देवळाच्या बाजूने उंचीची ‍संरक्षण भिंत आहे. गाभार्‍यातील मयूरेश्वराची मूर्ती बैठी, डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे. मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहेत. असा हा मोरेश्वर अत्यंत देखणा आहे. तिथून सुटलो आणि थेट जेजुरीलाच जाऊन थांबलो मार्तंड भैरवाच ठिकाण ते. दुसरे कैलास शिखर म्हणतात त्याला मस्त सगळीकडे पिवळी हळद उडविलेली दिसते वर्षातील 12 महिने जेजुरी हळदीने भरलेली असते. हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून  जेजुरीचा खंडोबा  या नावाने  सर्वपरिचित आहे. उंच डोंगरावर असलेल्या कडेपठार या ठिकाणी जुने खंडोबाचे स्थान होते. परंतु आता जेजुरी या ठिकाणी नव्याने बांधलेले देऊळ आहे. तिथे आम्हाला बरीच गर्दी लागली अडीच तासात दर्शन घेऊन गाडीपाशी आलो आणि पुढचे नियोजन करू लागलो.आमचं मग त्या दिवशी मुक्काम कोल्हापूर ला करायचा ठरला. थोड्या वेळानन्तर आम्ही एका ठिकाणी चहा घेतला आणि रात्री 9 च्या सुमारास आम्ही कोल्हापूर ला पोहचलो तिथे हॉटेल वैगेरे शोधूस्तोवर 1 तास गेला परंतु हॉटेल अगदी मंदिरासमोर च मिळाले होते त्यामुळे सकाळची पायपीट वाचणारी होती. मग रात्री जेवण करून आनी मग सकाळी लवकर उठून दर्शन घ्यायचे असे ठरले आणि आम्ही बेड वर पडल्या पडल्याचं निद्राधीन झालो.



मोरेश्वर , मोरगाव.
ब्लॉग खाली त्या दिवसातील काही फोटो टाकत आहे.
मार्तंड भैरव देवस्थान , जेजुरी.
महागणपती , रांजणगाव.

Comments