सफर कोकणातील (अंतिम) #Kokan #Day_3.

भाग २ पासून पुढे,


सकाळी गजरच्या आवाजाने झोपमोड झाली उठुशी तर वाटत नव्हतं पण समुद्राच्या आवाजाने डोळे उघडले.  पटापट सगळ्यांना उठवलं आणि अर्ध्या तासात समुद्राकडे मार्गस्थ झालो. या समुद्र आणि वाळूचा किनारा असल्याने तेथे पर्यटकांची अतिशय गर्दी पहावयास मिळते. पर्यटक सुट्ट्या मधे पुळ्याच्या समुद्राला अवश्य भेट देतात. 6:15 च्या दरम्यान माझ्या आयुष्यातल्या पहिल्या वहिल्या समुद्राचे दर्शन मला झाले. समुद्राला अथांग सागर का म्हणतात ते मला त्या दिवशी कळले. डोळ्यात बसणार नाही एवढे पाणी बघून दोन मिनिटं स्तब्ध झालो. खरच किती मोठा तो समुद्र आतमध्ये काय काय घेऊन दडलाय कोणाला याची कल्पना ही नाही. असो तर सकाळी 6:15 ला देखील तिथे तुरळक गर्दी होतीच. ही काही आश्चर्याची बाब नव्हती. समुद्रात फिरून किनाऱ्यावर नावे काढून दोन तीन तास कसे लोटले ते कळलं देखील नाही. गणपतीपुळे ला वॉटर स्पोर्ट च्या नावाखाली आहे तर फक्त बोटिंग आणि बाईक रायडिंग (पाण्याची पण आणि किनाऱ्याची पण) आम्ही फक्त बोटिंग चा अनुभव घेतला. तो देखील थोडा थरारक च म्हणावं लागेल. बोट वाला लाटांच्या विरुद्ध दिशेला बोट नेत असतो त्यामुळे बोट थोडी पुढं जाऊसतोवर आतमध्ये बसलेल्या ला झटके लागतात. 5 मिनिटात आम्हाला समुद्राच्या मध्यभागी अस नाही म्हणता येणार पण किनाऱ्यापासून थोडेसे लांबच नेलं होत. तिथून फिरून परत येताना आम्हाला पॅराशूट बोले तो मोठा फुगा दिसला . लोक त्याचाही आनंद घेत होते. आम्ही जिथे होते तिथून ते थोडे लांब होते आणि नक्कीच खर्चिक असल्यामुळे ह्या वेळेस तरी आम्ही ते टाळलेलं होत. किनाऱ्यावरून परत जायची इच्छाच होत नव्हती पण जावे तर लागणारच म्हणून 9 च्या सुमारास आम्ही तिथून निघालो हॉटेल वर जाऊन आंघोळ केली (समुद्राचे पाणी चिकट होते) मग मस्त पैकी साऊथ इंडियन नाष्टा करून आम्ही गणपतीपुळे गाव फिरायला निघालो. स्थानिक लोकांकडून कळले गावात प्रसिद्ध असे दोन ठिकाणे ते पण शेजारी शेजारीच आहे ते म्हणजे मॅजिक गार्डन व प्राचीन कोकण (म्युझियम) . मॅजिक गार्डन व प्राचीन कोकण पैकी आम्हाला कोणते तरी एक निवडायचे होते कारण वेळेचा अभाव होता. मॅजिक गार्डन फिरायचे म्हणले तर 3 तास गेले असते व तिथे एन्जॉयमेंट झाली असती. प्राचीन कोकण मध्ये 2 तास आणि  कोकणची सर्व माहिती तिथे मिळणार होती. आम्ही प्राचीन कोकण फिरायचा निर्णय घेतला. त्यामुळे आम्हाला कोकणची माहीत मिळाली. कोकणाची प्राचीन समाजरचना, जुनी वेशभूषा व केशभूषा, बारा बलुतेदार, जुनी उपकरणे व हत्यारे यांच्या सहाय्याने इतिहास जिवंत केला आहे. हिरव्यागर्द टेकडीवर ३ एकर जागेत एक टुमदार कोकणी गाव इथे उभं राहिलं आहे. माफक तिकिटांत तेथील गाईडच्या सहाय्याने आपल्याला या प्राचीन कोकणीची सफर घडते. 1 वाजेच्या दरम्यान तिथून बाहेर पडलो आजचा मुक्काम जमणार नव्हतो मग काय मनात नसताना सुद्धा गपगुमान आपल गाडीत बसलो. व गाडी आता थेट नगरकडे रवाना झाली. जाता जाता 3 वाजता जेवण केले आणि 5 च्या सुमारास चहा घेतला . आमचा ड्रायव्हर चांगला होता गाडी व्यवस्थित चालवत होता नाही म्हणत तरी आम्हाला नगर गाठायला रात्रीचे 12 :15 झाले . व आमच्या प्रवासाचा शेवट झाला. दुसऱ्या दिवशी सुट्टी घेतल्या कारणाने 10 लाच जाग आली. आणि या 3 दिवसाच खरच सोन केल्यासारखं वाटलं. खरच माझ्या पहिल्या समुद्राचं , गणपती बापाच्या दर्शनाच, प्राचीन कोकण व पूर्ण प्रवासाच आयुष्यात क्वचित च विसर पडेल.

(संदर्भ फोटो देत आहे)

                समुद्र किनारा, गणपतीपुळे (सकाळ) 


येथून पुढे प्राचीन कोकण (म्युझियम) येथील काही फोटो देत आहे....
नावाडी.

ग्राम दैवत.

बकरी (घर).

स्वयंपाक घर.

मासोळी.

गरुड.

शेतकरी व त्याची मुलगी (घर).

खेळणी बनवणारा.

मुले (खेळताना)

किल्ला.
      

Comments

Popular posts from this blog

सफर कोकणातील #Kokan #Day_2