Posts

रस्ता (भयकथा)....

=रस्ता= तीन वर्षांपूर्वीची सत्य घटना आहे. अशीच जून-जुलै मधली. मी, केदार, प्रसाद आणि सुशांत पुण्याहून विदर्भातल्या माहूरला गेलो होतो. तेव्हा आलेला हा भयाण अनुभव. . आम्ही चौघं इनोव्हा घेऊन संध्याकाळच्या सुमारास कारंजात पोहचलो. कारंजा म्हणजे दत्तसंप्रदायातील महत्वाचं स्थान. तिथे तासभर थांबायचं आणि पुढे १५० किमीवर असलेल्या माहूरला निघायचं, असं ठरलं होतं. पण पावसामूळे आणि गाडीने नाटकं केल्याने कारंजात पोहचायला रात्रीचे ८ः३० वाजले. तिथे दर्शन आणि जेवण वगैरे करत १०:०० झाले...  पाऊस सुरूच होता... गाडीचा बॅटरी प्रॉब्लेम... त्यामुळे पुढे जावं की नाही, हा प्रश्न होता. हो हो नाही नाही करत १०ः३० वाजता आम्ही पुढे जायचं ठरवलं... ड्रायव्हिंगचं तसं टेंशन नव्हतं... पण तो भाग आम्हाला नवा होता, शिवाय पाऊस... ! सुट्टीचं नियोजन असल्याने वेळ वाया न घालवता आम्हाला पूर्ण ट्रिप करायची होती... म्हणून हळू हळू पोहचून जाऊ म्हणत आम्ही निघालोच... त्या आधी मंदीराजवळ गाडी पार्क केली तिथे एका दुकानाच्या आडोशाला उभ्या तीन गुरुजींनी आम्हाला शेगांवला जाण्यासाठी कारंजा बस स्थानकापर्यंत लिफ्ट मागितली. त्यांनाही बरो...

सफर कोकणातील (अंतिम) #Kokan #Day_3.

Image
भाग २ पासून पुढे, सकाळी गजरच्या आवाजाने झोपमोड झाली उठुशी तर वाटत नव्हतं पण समुद्राच्या आवाजाने डोळे उघडले.  पटापट सगळ्यांना उठवलं आणि अर्ध्या तासात समुद्राकडे मार्गस्थ झालो. या समुद्र आणि वाळूचा किनारा असल्याने तेथे पर्यटकांची अतिशय गर्दी पहावयास मिळते. पर्यटक सुट्ट्या मधे पुळ्याच्या समुद्राला अवश्य भेट देतात. 6:15 च्या दरम्यान माझ्या आयुष्यातल्या पहिल्या वहिल्या समुद्राचे दर्शन मला झाले. समुद्राला अथांग सागर का म्हणतात ते मला त्या दिवशी कळले. डोळ्यात बसणार नाही एवढे पाणी बघून दोन मिनिटं स्तब्ध झालो. खरच किती मोठा तो समुद्र आतमध्ये काय काय घेऊन दडलाय कोणाला याची कल्पना ही नाही. असो तर सकाळी 6:15 ला देखील तिथे तुरळक गर्दी होतीच. ही काही आश्चर्याची बाब नव्हती. समुद्रात फिरून किनाऱ्यावर नावे काढून दोन तीन तास कसे लोटले ते कळलं देखील नाही. गणपतीपुळे ला वॉटर स्पोर्ट च्या नावाखाली आहे तर फक्त बोटिंग आणि बाईक रायडिंग (पाण्याची पण आणि किनाऱ्याची पण) आम्ही फक्त बोटिंग चा अनुभव घेतला. तो देखील थोडा थरारक च म्हणावं लागेल. बोट वाला लाटांच्या विरुद्ध दिशेला बोट नेत असतो त्यामुळे बोट थ...

सफर कोकणातील #Kokan #Day_2

Image
भाग १ पासून पुढे , सकाळी डोळे उघडले तेव्हा 8 वर काटा आलेला होता रात्री उशिर झाल्यामुळे लवकर उठायचं सुधरलंच नाही. आम्ही सगळे उठून पटापट आवरून तयार होऊस्तोवर 9:30 वाजले होते. बाहेर आलो दर्शनाची तर रांगच रांग लागलेली होती. मुखदर्शन घ्यायचे का रांगेत लागायचं याचा विचार आम्ही करत होतो. पण परत म्हणलं जाऊद्या परत परत थोडी ना येन होतय. त्यामुळे रांगेत लागलो. आत मध्ये एन्ट्री केल्यावर मंदिराचा परिसर न्याहाळ्यायला मिळतो.  महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. पंचगंगा इथली प्रमुख नदी आहे. कोल्हापूरच मंदिर खरच खूप छान. दगडी बांधकाम एकदम जुन्या जमान्यात आल्या सारख वाटलं. मुख्य दरवाज्याच्या बाहेर कोरीव मूर्तीच नक्षीकाम खरच अदभुत आहे. ते तिथे गेल्यावर च कळते. दर्शन होऊ पर्यंत 11:10 झाले. मग आम्ही ठरवलं पोटभर न्याहारी करून घ्यायची आणि निघायचं. अंधार पडायच्या आत गणपतीपुळे गाठायचं होत म्हणून रंकाळा तलाव वर जायला टाळले. मराठी पिच्चर आल्यानन्तर गणपतीपुळे फारच प्रसिद्ध झालेलं आहे. कोकणपट्टा खरच अवर्णनीय आहे. सगळं होऊ पर...

सफर कोकणातील #Kokan #Day_1

Image
कोकण हा माझा पहिलाच ब्लॉग आहे काही चूकल तर माफी असावी. या ब्लॉग मध्ये मी माझा कोकणातील अनुभव व्यक्त करत आहे . कोकण म्हणजे नेमकं काय असत हे काही मला माहिती नव्हतं. लहान पनापासून कोकणात वगैरे गेलो नव्हतो. फक्त एकच कोकम मला माहित होतं ते म्हणजे सरबत. तर ते जिथं बनत तिथं आमचा जायचा प्लॅन अचानक बनला. ते म्हणतात ना अचानक भयानक. एक वीकएंड आणि एक शासकीय सुट्टी आलेली होती आणि आम्ही एक आधी घेतली. तर सुरवात करतो ते आमच्या प्लॅनिंग पासून च आम्ही चार मित्र मी निशांत , वेदांत , संकेत आणि स्वप्नील सुरवात झाली ती वेदांत च्या फोन वरून कट्टयावर भेटायला बोलवलं होत सगळ्यांना. त्या प्रमाणे त्या संध्याकाळी आम्ही आमच्या नेहमीच्या कट्ट्यावर भेटलो. वेदांत च्या डोक्यात Weekend + सुट्टी = Trip ही कल्पना आलती . कुठं जायचं तर जवळ्यात जवळ म्हणून आणि First Time Experiance म्हणून आम्ही कोकणातील भाग निवडला. असा पण उन्हाळ्याचे शेवटचे दिवस होते त्यामुळे समुद्रकिनारी जायचा प्लॅन तर भन्नाट होता. तो दिवस मंगळवार होता म्हणजे आमचा WeekEnd तर मार्गी लागणार होता. प्लॅनिंग केली , गाडी ड्राइवर सहित , कुणी काय खाय...